Virat Kohli Family Emergency: कसोटी मालिकेपूर्वी टीम इंडियाला धक्का, विराट कोहली अचानक भारतात परतला; जाणून घ्या कारण
नुकताच कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या कोहलीला कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे भारतात परतावे लागले. क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तथापि, त्याच्याबद्दल कोणतेही अधिकृत अपडेट किंवा कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
Virat Kohli: केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने दक्षिण आफ्रिकेत एकदिवसीय मालिका जिंकली. आता भारताला कसोटी मालिका सुरू करायची आहे. याआधी विराट कोहली (Virat Kohli) भारतात परतला आहे. नुकताच कसोटी मालिकेसाठी दक्षिण आफ्रिकेत गेलेल्या कोहलीला कौटुंबिक वैद्यकीय आणीबाणीमुळे भारतात परतावे लागले. क्रिकबझच्या रिपोर्टमध्ये ही माहिती देण्यात आली आहे. तथापि, त्याच्याबद्दल कोणतेही अधिकृत अपडेट किंवा कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. क्रिकबझच्या अहवालात असे म्हटले आहे की बीसीसीआयच्या सूत्रांचे म्हणणे आहे की सेंच्युरियनमध्ये 26 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी तो वेळेत जोहान्सबर्गला परतेल. (हे देखील वाचा: Impact Fielder Of The ODI Series: दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मालिका काबीज केल्यानंतर साई सुदर्शनला मिळीले इम्पॅक्ट फील्डर पदक, संजू सॅमसनचे करण्यात आले जोरदार कौतुक (Watch Video)
🚨 India updates🚨
- Kohli returns home due to family emergency
- Gaikwad ruled out of series#SAvsIND https://t.co/WjQJ8Pent6
— Cricbuzz (@cricbuzz) December 22, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Dec 22, 2023 01:57 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

