RCBW Beat UPW, WPL 2024: शोभना आशाच्या पाच विकेटच्या जोरावर आरसीबीचा यूपी वॉरियर्सचा 2 धावांनी पराभव

शोभना आशा एका डावात पाच विकेट घेणारी WPL ची पहिली गोलंदाज ठरली आहे.

शोभना आशाच्या पाच विकेटच्या जोरावर आरसीबीने यूपी वॉरियर्सचा 2 धावांनी पराभव केला, आरसीबीच्या पहिल्या डावात रिचा घोष (62) आणि एस मेघना (53) यांच्या अर्धशतकांमुळे आरसीबीने 157 धावां करत यूपी वॉरियर्सला 158 धावांचे लक्ष्य दिले होते. यूपी वॉरियर्सची कर्णधार ॲलिसा हिलीने नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.यूपीकडून ग्रेस हॅरिस 1, ताहलिया मॅकग्रा 1, सोफी एक्लेस्टोन 1, दीप्ती शर्मा 1, राजेश्वरी गायकवाडने 2 बळी घेतले. 158 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना यूपी वॉरियर्सला पहिला धक्का बसला आहे. सोफी मोलिनक्सने ॲलिसा हिलीला बाद करून पॅव्हेलियनमध्ये पाठवले आहे. यूपी वॉरियर्सला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 155 धावा करता आल्या. शोभना आशा एका डावात पाच विकेट घेणारी WPL ची पहिली गोलंदाज ठरली आहे.

पाहा पोस्ट -

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)



संबंधित बातम्या