Team India मध्ये पुनरागमन करण्यासाठी Shikhar Dhawan गाळत आहे प्रचंड घाम, सराव करतानाची फोटो व्हायरल

संघ व्यवस्थापनाने त्याला फार पूर्वीच कसोटी आणि टी-20 संघातून वगळले होते. त्याचवेळी, निवडकर्त्यांनी गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यापासून धवनला वनडे संघात संधी दिलेली नाही.

Shikhar Dhawan (Photo Credit - Twitter)

भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी फलंदाज आणि पंजाब किंग्जचा कर्णधार शिखर धवनने (Shikhar Dhawan) आपल्या सराव सत्रातील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केली आहेत. या फोटोचां ठावठिकाणा माहीत नसला तरी शिखर धवन बंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीमध्ये (NCA) प्रशिक्षण घेत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिखर धवनने या वर्षात आतापर्यंत भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. संघ व्यवस्थापनाने त्याला फार पूर्वीच कसोटी आणि टी-20 संघातून वगळले होते. त्याचवेळी, निवडकर्त्यांनी गेल्या वर्षी बांगलादेश दौऱ्यापासून धवनला वनडे संघात संधी दिलेली नाही. तथापि, धवनने संघात पुनरागमन करण्याच्या आपल्या आशा जिवंत ठेवल्या आहेत ज्यासाठी तो खूप मेहनत घेत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Shikhar Dhawan (@shikhardofficial)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)