PBKS Beat GT: पंजाबने गुजरातच्या जबड्यातून हिसकावला विजय, शशांक सिंग आणि आशुतोष शर्माने केला चमत्कार
या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह पंजाब किंग्जने दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे.
GT vs PBKS, IPL 2024 17th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 17 वा सामना गुजरात टायटन्सचा आणि पंजाब किंग्ज यांच्यात अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला गेला. या रोमांचक सामन्यात पंजाब किंग्जने गुजरात टायटन्सचा तीन गडी राखून पराभव केला आहे. या विजयासह पंजाब किंग्जने दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. त्ततपुर्वी, प्रथम फलंदांजी करताना गुजरातने पंजाबसमोर 200 धावांचे लक्ष्ये ठेवले आहे. गुजरात टायटन्ससाठी सलामीवीर शुभमन गिलने नाबाद 89 धावांची शानदार खेळी केली. पंजाब किंग्जकडून कागिसो रबाडाने सर्वाधिक दोन बळी घेतले. लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने 19.5 षटकांत सात गडी गमावून लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जकडून शशांक सिंगने सर्वाधिक नाबाद 61 धावांची खेळी खेळली. गुजरात टायटन्सकडून नूर अहमदने सर्वाधिक दोन बळी घेतले.
Match 17. Punjab Kings Won by 3 Wicket(s) https://t.co/0Sy2civWDI #TATAIPL #IPL2024 #GTvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) April 4, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 04, 2024 11:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

