IND vs SA ICC World Cup 2023 Live Score Update: शमीची धार, जडेजाची जादू; आफ्रिकेचे 6 फलंदाज 59 धावसंख्येवर बाद
प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने 101 नाबाद धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.
आयसीसी विश्वचषक 2023 च्या 37 व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात, भारत आणि दक्षिण आफ्रिका (IND vs SA) संघ आज कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर आमनेसामने आहेत. या दोन्ही संघांनी विश्वचषकाच्या उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली असून गुणतालिकेत पहिले दोन स्थान काबीज केले असून गुणतालिकेच्या वर्चस्वासाठी त्यांच्यामध्ये लढत होणार आहे. अशा स्थितीत विश्वचषकातील आतापर्यंतच्या दोन सर्वात यशस्वी संघांमध्ये चुरशीची स्पर्धा अपेक्षित आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत भारताने दक्षिण आफ्रिकेसमोर 327 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. टीम इंडियासाठी स्टार फलंदाज विराट कोहलीने 101 नाबाद धावांची शानदार खेळी केली. दक्षिण आफ्रिकेकडून मार्को जॉन्सन, केशव महाराज, तबरेझ शम्सी, कागिसो रबाडा आणि लुंगी एनगिडी यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. हा सामना जिंकण्यासाठी दक्षिण आफ्रिकेला 50 षटकात 327 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या संघाला सहावा मोठा झटका बसला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या संघाची धावसंख्या 59/6
CWC2023. WICKET! 16.3: David Miller 11(11) b Ravindra Jadeja, South Africa 59/6 https://t.co/r1p0QAZWOi #INDvSA #CWC23
— BCCI (@BCCI) November 5, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Nov 05, 2023 07:56 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

