Shadab Khan Carried Off the Field on Shoulders: पाकिस्तान राष्ट्रीय T20 सामन्यात दुखापत झाल्यानंतर स्ट्रेचर नसल्यामुळे शादाब खानला खांद्यावरुन नेले मैदानाबाहेर , Video Viral
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय टी-20 चषक 2023 मध्ये तयारी करत आहे.
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू शादाब खान आपला हरवलेला फॉर्म परत मिळवण्यासाठी सध्या सुरू असलेल्या राष्ट्रीय टी-20 चषक 2023 मध्ये तयारी करत आहे. स्पर्धेतील सियालकोट विरुद्ध रावळपिंडी सामन्यादरम्यान एक दुर्दैवी घटना घडली ज्यामध्ये शादाबच्या घोट्याला दुखापत झाली आणि त्याला चालता येत नव्हते. ज्या मैदानात सामना खेळला जात होता त्या मैदानात एकही स्ट्रेचर नव्हता आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असे दिसून आले आहे की एका सहकारी खेळाडूला त्याला खांद्यावर घेऊन मैदानाबाहेर जावे लागले. (हेही वाचा - India Beat Australia: रोमहर्षक सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 6 धावांनी केला पराभव, मालिका 4-1 ने जिंकली)
पाहा व्हायरल व्हिडिओ -
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)