IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: टीम इंडिया अडचणीत; भारताने गमावली सातवी विकेट, दुखापत असूनही रोहित क्रीजवर

टीम इंडियाला आता 42 चेंडूत 64 धावांची गरज आहे. सातवी विकेट पडल्यानंतर दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीला आला.

IND vs BAN 2nd ODI 2022 Live Update: टीम इंडिया अडचणीत; भारताने गमावली सातवी विकेट, दुखापत असूनही रोहित क्रीजवर
Rohit Sharma (Photo Credit - Twitter)

IND vs BAN: भारताला 43व्या षटकात सातवा धक्का बसला. शार्दुल ठाकूर 23 चेंडूत सात धावा करून बाद झाला. त्याला शाकिबने यष्टिचित केले. टीम इंडियाला आता 42 चेंडूत 64 धावांची गरज आहे. सातवी विकेट पडल्यानंतर दुखापतग्रस्त कर्णधार रोहित शर्मा फलंदाजीला आला. सामन्याच्या सुरुवातीलाच त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला दुखापत झाली. यानंतर त्यांना स्कॅनसाठी रुग्णालयातही नेण्यात आले. त्यानंतर त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर प्लास्टर कास्ट दिसला. मात्र, असे असूनही तो फलंदाजीसाठी उतरला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Dec 07, 2022 07:20 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).