IND vs SL ICC World Cup 2023 Live Score Update: श्रीलंकेच्या 22 धावांत पडल्या सात विकेट, मोहम्मद शमीला मिळाली तिसरी विकेट

नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून शुभमन गिल 92, विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यरने 82 सर्वाधिक धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने 5 सर्वाधिक विकेट घेतल्या.

IND vs SL ICC World Cup 2023 Live Score Update: श्रीलंकेच्या 22 धावांत पडल्या सात विकेट, मोहम्मद शमीला मिळाली तिसरी विकेट

विश्वचषक 2023 च्या 33व्या (ICC Cricket World Cup 2023) सामन्यात आज भारताचा सामना श्रीलंकेशी (IND vs SL) होत आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. सहापैकी सहा सामने जिंकून टीम इंडिया मजबूत स्थितीत आहे, तर श्रीलंकेने सहापैकी केवळ दोनच सामने जिंकले आहेत. आजच्या विजयासह भारत उपांत्य फेरीतील आपले स्थान जवळपास निश्चित करेल. त्याच वेळी, श्रीलंकेसाठी हा करा किंवा मरोचा सामना आहे. दरम्यान, श्रीलंकेचा कर्णधार कुसल मेंडिसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाने श्रीलंकेसमोर 358 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून शुभमन गिल 92, विराट कोहली 88 आणि श्रेयस अय्यरने 82 सर्वाधिक धावा केल्या. तर श्रीलंकेकडून दिलशान मधुशंकाने 5 सर्वाधिक विकेट घेतल्या. श्रीलंकेला हा सामना जिंकण्यासाठी 50 षटकात 358 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेच्या संघाला सातवा मोठा धक्का बसला आहे. दुष्मंथा चमेरा 0 धावा करून मोहम्मद शमीचा बळी ठरला. श्रीलंकेच्या संघाचा स्कोअर 23/7.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Nov 02, 2023 08:03 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).