IPL 2023, Match 14 SRH vs PBKS Live Score Update: पंजाबने हैदराबादसमोर 144 धावांचे लक्ष्य ठेवले, शिखर धवनने नाबाद केल्या 99 धावा

हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत.

IPL 2023, Match 14 SRH vs PBKS Live Score Update: पंजाबने हैदराबादसमोर 144 धावांचे लक्ष्य ठेवले, शिखर धवनने नाबाद केल्या 99 धावा

इंडियन प्रीमियर लीगमध्ये आज दोन सामने होणार आहेत. सुपर संडेचा दुसरा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज (SRH vs PBKS) यांच्यात होत आहे. हैदराबादच्या राजीव गांधी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या 16व्या हंगामात या दोन्ही संघांनी प्रत्येकी दोन सामने खेळले आहेत. जिथे पंजाब किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्सचा चुरशीच्या सामन्यात पराभव केला आहे. त्याचबरोबर सनरायझर्सला लखनौ सुपर जायंट्स आणि राजस्थान रॉयल्सविरुद्ध एकतर्फी पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार एडन मार्करामने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नाणेफेक हारल्यानंतर पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 9 गडी गमावून 143 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून सलामीवीर शिखर धवनने सर्वाधिक नाबाद 99 धावा केल्या. सनरायझर्स हैदराबादकडून मयंक मार्कंडेने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. सनरायझर्स हैदराबादला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 144 धावा करायच्या आहेत.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 09, 2023 09:26 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).