Pakistani Captian Fatima Sana Father Death: टी-20 वर्ल्ड कप दरम्यान दु:खद बातमी, पाकिस्तानी कर्णधार फातिमा सनाच्या वडिलांचे निधन
फातिमाच्या वडिलांचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. याच कारणामुळे ती यूएईहून कराचीला परतली आहे. फातिमाच्या वडिलांच्या निधनानंतर संघातील खेळाडूही दु:खी आहेत.
ICC Women's T20 World Cup 2024: पाकिस्तानची कर्णधार फातिमा सना (Fatima Sana) 2024 च्या महिला टी-20 विश्वचषकातून बाहेर पडून मायदेशी परतली आहे. फातिमाच्या वडिलांचे निधन झाले आहे. बातमी मिळताच ती यूएईहून कराचीला निघून गेली. अलीकडेच पाकिस्तानला भारताविरुद्ध दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. आता त्याचा पुढचा सामना ऑस्ट्रेलियाविरुद्ध आहे. फातिमाच्या अनुपस्थितीत मुनिबा अलीकडे संघाची कमान सोपवली जाईल. ती संघाची उपकर्णधार आहे. क्रिकबझच्या बातमीनुसार, फातिमाच्या वडिलांचा स्ट्रोकमुळे मृत्यू झाला. याच कारणामुळे ती यूएईहून कराचीला परतली आहे. फातिमाच्या वडिलांच्या निधनानंतर संघातील खेळाडूही दु:खी आहेत. पाकिस्तानची खेळाडू निदा दार हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून शोक व्यक्त केला आहे. तिच्यासोबत इतर खेळाडूंनीही ही पोस्ट शेअर केली आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)