Shubman Gill Batted Well For MI: मुंबईने प्लेऑफमध्ये प्रवेश केल्यानंतर सचिन तेंडुलकरने केली शुभमनची प्रशंसा
कॅमेरून ग्रीन आणि शुभमन गिल यांनी मुंबई इंडियन्ससाठी चांगली फलंदाजी केल्याचे ट्विट सचिनने केले.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध (RCB) शुभमन गिलने (Shubhman Gill) शानदार शतक झळकावल्यानंतर मुंबई इंडियन्सने (Mumbai Indians) IPL 2023 च्या प्लेऑफमध्ये (Play-Off) प्रवेश केला. गिलच्या 52 चेंडूंत नाबाद 104 धावांच्या जोरावर गुजरातने यंदाच्या स्पर्धेतील गट टप्प्यातील अंतिम सामन्यात आरसीबीवर 6 गडी राखून विजय मिळवला. आरसीबीच्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला प्ले-ऑफमध्ये अंतिम स्थान मिळाले.
यानंतर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने गिलचे कौतुक केले आणि त्याने एमआयसाठी उत्कृष्ट खेळी खेळल्याचे ट्विट केले. कॅमेरून ग्रीन आणि शुभमन गिल यांनी मुंबई इंडियन्ससाठी चांगली फलंदाजी केल्याचे ट्विट सचिनने केले. या ट्विटमध्ये त्याने विराट कोहलीच्या इंनिगचेही कौतुक केले.
पाहा ट्विट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)