Sachin Tendulkar ने जिंकली काश्मिरी तरुणांची मने! Kashmir मध्ये स्ट्रीट क्रिकेट खेळतानाचा घेतला आनंद (Watch Video)
यावेळी त्यांनी फलंदाजी करत युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले.
Sachin Tendulkar Played Cricket in Kashmir: क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) सध्या काश्मीरच्या सुंदर खोऱ्यांचा आनंद घेत आहे. त्यांच्या भेटीदरम्यान एक हृदयस्पर्शी घटना उघडकीस आली असून, त्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे. सचिन तेंडुलकर गुलमर्गला गेला होता, जिथे त्याने स्थानिक तरुणांसोबत उत्साही रस्त्यावरील क्रिकेट सामन्यात भाग घेतला. यावेळी त्यांनी फलंदाजी करत युवा खेळाडूंना प्रोत्साहन दिले. सचिन तेंडुलकरचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.cव्हिडिओमध्ये सचिन हसताना, तरुणांसोबत बोलताना आणि क्रिकेट खेळताना दिसत आहे. त्यांचा साधा स्वभाव आणि तरुणाईत मिसळण्याची पद्धत लोकांची मने जिंकत आहे. (हे देखील वाचा: Shiv Jayanti 2024: शिवजयंती दिनी Sachin Tendulkar कडून शिवरायांप्रति आदरांजली व्यक्त)
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)