MCC ने सादर केलेल्या नव्या नियमांचे Sachin Tendulkar कडून स्वागत; व्हिडीओ पोस्ट करत केले कौतुक (Watch)

मॅनकेडिंगला आता रनआऊटचा भाग बनवण्यात आले असून या पद्धतीने बाद होणारा फलंदाज रनआउट समजला जाईल

Sachin Tendulkar (Photo Credits: Getty Images)

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (Marylebone Cricket Club) कॅच-आउट आणि मॅनकेडिंगशी संबंधित नियमांमध्ये बदल केले आहेत. आता एखादा फलंदाज झेलबाद झाल्यावर नवीन फलंदाजाला पहिला चेंडू खेळावा लागेल. त्याचवेळी, मॅनकेडिंगला आता रनआऊटचा भाग बनवण्यात आले असून या पद्धतीने बाद होणारा फलंदाज रनआउट समजला जाईल. रनआऊटचा भाग बनवल्याने गोलंदाजांना अशा पद्धतीने विकेट घेणे सोपे जाईल. आता सचिन तेंडूलकरने एमसीसीच्या या नियमांचे स्वागत केले आहे.

सचिनने एक व्हिडीओ पोस्ट करत, ‘क्रिकेट हा एक सुंदर खेळ आहे. तो आम्हाला विद्यमान नियमांना आव्हान देण्यास आणि खेळाचे कायदे सुधारण्यात मदत करण्यास अनुमती देतो. एमसीसी सादर केलेले काही बदल प्रशंसनीय आहेत,’ असे म्हटले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now