Sachin Meets Tendulkar: गाडी थांबवून सचिन तेंडुलकरने चाहत्यांना केले आश्चर्यचकित, व्हिडिओ शेअर करत लिहिला हृदयस्पर्शी संदेश (Watch Video)
सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर त्याच्या कारमधून कुठेतरी जात आहे. मग वाटेत त्याची नजर मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेल्या चाहत्यावर पडली आणि जर्सीच्या पाठीमागे तेंडुलकर असे लिहिलेले होते.
Sachin Meets Tendulkar: क्रिकेटचा देव म्हणून ओळखला जाणारा माजी दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) भेटण्याचे प्रत्येक चाहत्याचे स्वप्न असते. क्रिकेटवर प्रेम करणाऱ्या चाहत्याला सचिन तेंडुलकरला भेटण्याची नक्कीच इच्छा असते. दरम्यान, सचिन तेंडुलकरने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये सचिन तेंडुलकर त्याच्या कारमधून कुठेतरी जात आहे. मग वाटेत त्याची नजर मुंबई इंडियन्सची जर्सी घातलेल्या चाहत्यावर पडली आणि जर्सीच्या पाठीमागे तेंडुलकर असे लिहिलेले होते. सचिनने लगेच गाडी थांबवली आणि चाहत्याशी बोलू लागला. एवढं मोठं सरप्राईज पाहून चाहत्यांलाही आश्चर्य वाटलं आणि तो भावूक झाला. सचिन तेंडुलकरने कॅप्शनमध्ये लिहिले की, जेव्हा मी माझ्यावर खूप प्रेमाचा वर्षाव करताना पाहतो तेव्हा माझे हृदय आनंदाने भरते. हे लोकांचे प्रेम आहे जे अनपेक्षित कोपऱ्यातून येत राहते जे आयुष्य खूप खास बनवते. या व्हिडिओला सोशल मीडियावर खूप पसंती दिली जात आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
पाहा व्हिडिओ
Sachin meets TENDULKAR. 😋
It fills my heart with joy when I see so much love showered on me. It is the love from the people that keeps coming from unexpected corners which makes life so special. pic.twitter.com/jTaV3Rjrgm
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Feb 01, 2024 07:38 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

