SA vs PAK 3rd T20I 2021: टी-20 क्रिकेटमध्ये Aiden Markram याचा जलवा, दक्षिण आफ्रिकेकडून हाशिम अमलानंतर हा खास पराक्रम करणारा दुसरा फलंदाज
दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान यांच्यात सेंच्युरियन येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात सलामीवीर एडन मार्क्रमने 31 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. मार्क्रमचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सलग तिसरे अर्धशतक आहे. यासह, टी-20 क्रिकेटमध्ये आफ्रिकेकडून सलग तीन अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे.
SA vs PAK 3rd T20I 2021: दक्षिण आफ्रिका (South Africa) आणि पाकिस्तान (Pakistan) यांच्यात सेंच्युरियन (Centurion) येथे सुरु असलेल्या तिसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेक गमावून पहिले फलंदाजी करत यजमान आफ्रिका संघाने निर्धारित 20 षटकांत 5 गडी गमावून 203 धावांचा डोंगर उभारला आहे. संघाचा सलामीवीर एडन मार्क्रमने (Aiden Markram) 31 चेंडूत चार चौकार आणि चार षटकारांच्या मदतीने सर्वाधिक 63 धावांची अर्धशतकी खेळी केली. मार्क्रमचे टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील हे सलग तिसरे अर्धशतक आहे. यासह, टी-20 क्रिकेटमध्ये आफ्रिकेकडून सलग तीन अर्धशतक ठोकणारा तो दुसरा खेळाडू ठरला आहे. मार्क्रमपूर्वी माजी फलंदाज हाशिम आमलाने (Hashim Amla) आफ्रिकी संघाकडून हा खास पराक्रम केला होता.
Fifty off 25 balls for Markram this match. He now has made three 50+ scores in a row in T20Is which has only been done once before by a South African batsman - Hashim Amla.
FOLLOW LIVE:
👉 https://t.co/4wHEmnZPvT 👈#SAvPAK #SAvsPAK #PAKvSA #PAKvsSA pic.twitter.com/lyQmQT89nY
— 🏏FlashScore Cricket Commentators (@FlashCric) April 14, 2021
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Apr 14, 2021 08:17 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

