Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Wedding: क्रिकेटर ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार अडकले विवाहबंधनात (See Photos)
उत्कर्षा ही वेगवान गोलंदाजी करणारी अष्टपैलू खेळाडू आहे. रिपोर्ट्सनुसार, ती पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (INFS) मध्ये शिकत आहे.
चेन्नई सुपर किंग्जचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड 3 जून रोजी उत्कर्षा पवारसोबत विवाहबंधनात अडकला. ऋतुराजची पत्नी उत्कर्षा पवार ही देखील एक क्रिकेटपटू आहे, जी महाराष्ट्राकडून क्रिकेट खेळली आहे. उत्कर्षा ही वेगवान गोलंदाजी करणारी अष्टपैलू खेळाडू आहे. रिपोर्ट्सनुसार, ती पुण्यातील इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन अँड फिटनेस सायन्सेस (INFS) मध्ये शिकत आहे. गायकवाडची डब्ल्यूटीसी फायनलसाठी स्टँडबाय खेळाडू म्हणून टीम इंडियामध्ये निवड झाली होती, परंतु लग्नामुळे त्याने माघार घेतली. गायकवाडच्या जागी, यशस्वी जैस्वालचा पुन्हा टीम इंडियामध्ये प्रवेश देण्यात आला. एमएस धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जला पाचवे आयपीएल विजेतेपद मिळवून देण्यात गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली होती. (हेही वाचा: ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नर पाकिस्तानविरुद्धच्या एससीजी मालिकेनंतर कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती)