Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Mehandi Ceremony: पार पडला ऋतुराज गायकवाड आणि उत्कर्षा पवार यांचा मेहंदी सोहळा; 3 जून रोजी अडकणार विवाहबंधनात

आज ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा आपापल्या हातावरील मेहंदी दाखवताना दिसत आहेत.

Ruturaj Gaikwad and Utkarsha Pawar Mehandi Ceremony

नुकतेच झालेल्या आयपीएल 2023 मध्ये चेन्नईला विजेतेपद मिळवून देण्यात युवा फलंदाज ऋतुराज गायकवाडने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने आयपीएल 2023 मध्ये चेन्नई संघासाठी चमकदार कामगिरी केली. आता ऋतुराज त्याच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरू करण्यासाठी सज्ज झाला आहे. ऋतुराज गायकवाड उत्कर्षा पवारसोबत 3 जून रोजी विवाहबंधनात अडकणार आहेत. उत्कर्षा स्वतः एक क्रिकेटर आहे. आज ऋतुराज आणि उत्कर्षा यांच्या मेहंदीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे फोटो समोर आले आहेत. यामध्ये ऋतुराज आणि उत्कर्षा आपापल्या हातावरील मेहंदी दाखवताना दिसत आहेत.

ऋतुराज गायकवाडने आयपीएल 2023 च्या 16 सामन्यांमध्ये 590 धावा केल्या, ज्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे. ऋतुराजचा आयपीएल 2023 मधील सर्वोत्तम स्कोअर 92 होता. (हेही वाचा: चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या गुडघ्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया; लवकरच मिळणार डिस्चार्ज)

 

View this post on Instagram

 

A post shared by Mufaddal Vohra (@mufastweet)

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now