Ross Taylor चा खळबळजनक आरोप, Rajasthan Royals च्या मालकाने 3-4 वेळा लगावली होती कानशिलात

त्याने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझीमध्ये असताना राजस्थान रॉयल्सच्या मालकांपैकी एकाने त्याच्या कानशिलात लगावली होती.

Ross Taylor (Photo Credit : Twitter)

न्यूझीलंडचा माजी दिग्गज फलंदाज रॉस टेलरने (Ross Taylor) त्याच्या आत्मचरित्रात एक खळबळजनक खुलासा केला आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला प्रसिद्ध झालेल्या "ब्लॅक अँड व्हाईट" नावाच्या पुस्तकात, टेलरने आयपीएलमध्ये त्याच्यासोबत घडलेल्या एका अप्रिय घटनेबद्दल सांगितले आहे. त्याने आपल्या पुस्तकात लिहिले आहे की, इंडियन प्रीमियर लीग (IPL) फ्रँचायझीमध्ये असताना राजस्थान रॉयल्सच्या मालकांपैकी एकाने त्याच्या कानशिलात लगावली होती. कारण पंजाब किंग्ज विरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर बाद झाला होता. ही कानशिलात जोरात नव्हती, कदाचित त्यांनी मस्करीत मारलं असेल पण हे करताना आम्ही तुला इतके हजारो डॉलर्स शून्यावर बाद होण्यासाठी देत नाही असंही म्हटलं होतं.

Tweet

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now