Rohit Sharma: रोहितनं जिंकल मन; पाकिस्तानी चाहत्याला दिली 'जादू की झप्पी', व्हिडिओ झाला व्हायरल

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी चाहते लोखंडी जाळीच्या पलीकडे रोहित शर्माची वाट पाहत असल्याचं दिसत आहेत. रोहित त्याच्याकडे पोहोचताच चाहत्यांच्या आनंद गगणाना भिडला.

Photo Credit - Twitter

आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्व संघ सराव सत्रात घाम गाळत असताना, चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी मैदानाबाहेर थांबले आहेत. अलीकडेच, भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो सराव सत्रादरम्यान काही पाकिस्तानी चाहत्यांना भेटताना दिसला आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी चाहते लोखंडी जाळीच्या पलीकडे रोहित शर्माची वाट पाहत असल्याचं दिसत आहेत. रोहित त्याच्याकडे पोहोचताच चाहत्यांच्या आनंद गगणाना भिडला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. तर, एका चाहत्यानं त्याला मिठी मारण्याची विनंती केली. रोहितनं उत्तर दिले की लोखंडी जाळीमुळं हे करणे कठीण आहे. परंतु, चाहत्यांची धडपड पाहून रोहित शर्माननं लोखंडी जाळीतूनच त्याला मिठी मारली. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Share Now
Advertisement