Rohit Sharma: रोहितनं जिंकल मन; पाकिस्तानी चाहत्याला दिली 'जादू की झप्पी', व्हिडिओ झाला व्हायरल
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी चाहते लोखंडी जाळीच्या पलीकडे रोहित शर्माची वाट पाहत असल्याचं दिसत आहेत. रोहित त्याच्याकडे पोहोचताच चाहत्यांच्या आनंद गगणाना भिडला.
आशिया चषक सुरू होण्यापूर्वी सर्व संघ सराव सत्रात घाम गाळत असताना, चाहते त्यांच्या आवडत्या खेळाडूला भेटण्यासाठी मैदानाबाहेर थांबले आहेत. अलीकडेच, भारतीय कर्णधार रोहित शर्माचा एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो सराव सत्रादरम्यान काही पाकिस्तानी चाहत्यांना भेटताना दिसला आहे. दरम्यान, व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये काही पाकिस्तानी चाहते लोखंडी जाळीच्या पलीकडे रोहित शर्माची वाट पाहत असल्याचं दिसत आहेत. रोहित त्याच्याकडे पोहोचताच चाहत्यांच्या आनंद गगणाना भिडला. यावेळी अनेक चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी काढले. तर, एका चाहत्यानं त्याला मिठी मारण्याची विनंती केली. रोहितनं उत्तर दिले की लोखंडी जाळीमुळं हे करणे कठीण आहे. परंतु, चाहत्यांची धडपड पाहून रोहित शर्माननं लोखंडी जाळीतूनच त्याला मिठी मारली. रोहित शर्माचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
Captain Rohit Sharma greeted some Pakistani fans on the ground. Such a lovely guy, The Hitman! pic.twitter.com/EakErJNsWt
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) August 26, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 27, 2022 04:46 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

