Rohit Sharma On Suryakumar Yadav Catch: विधानभवनात रोहित शर्माची सूर्याच्या कॅचवर मिश्किल प्रतिक्रिया, म्हणाला, 'बरं झालं हातात बाॅल बसला, नाहीतर त्याला...' (Watch Video)
आज टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऑलराउंड शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांचा विधानभवनात सत्कार पार पडला. यावेळी रोहित शर्माने मराठीत भाषण केले.
Maharashtra Government to Honor: गुरुवारी संध्याकाळी टीम इंडियाचे (Team India) मुंबईत (Mumabi) जंगी स्वागत करण्यात आले. नरिमन पॉइंटवरून भारताचे सर्व खेळाडूंनी ओपनडेक बसमध्ये बसून विजयी परेडला सुरुवात केली आणि खेळाडू आणि सपोर्ट स्टाफनेही चाहत्यांच्या शुभेच्छा स्वीकारल्या. बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी आणि सचिव जय शाह यांनी टीम इंडियाला 125 कोटी रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. आज टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, ऑलराउंड शिवम दुबे आणि यशस्वी जयस्वाल या चौघांचा विधानभवनात सत्कार पार पडला. यावेळी रोहित शर्माने मराठीत भाषण केले. यावेळी त्याने रोहित शर्माच्या कॅचवर मिश्किल प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला, प्रत्येक सामन्याचा नायक वेगळा होता. सूर्याच्या हातात कॅच बसला नसता.. बरं झालं हातात कॅच बसला नाहीतर त्याला मी पुढे बसवले असते. सर्वांचे खूप खूप आभार.' रोहितच्या या मिश्किल टिप्पणीनंतर सेंट्रल हॉलमध्ये एकच हशा पिकला.
पाहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)