ICC Champions Trophy 2025 जिंकल्यानंतर मुंबई मध्ये परतला Rohit Sharma; दिमतीला कडेकोट सुरक्षा व्यवस्था (Watch Video)
मुंबई विमानतळावर आज रोहित शर्मा रात्री 9 च्या सुमारास आल्याचं पहायला मिळालं आहे. यावेळी त्याच्या भोवती सुरक्षा रक्षकांचा गराडा होता.
ICC Champions Trophy 2025 जिंकल्यानंतर कॅप्टन रोहित शर्मा मुंबई मध्ये परतला आहे. न्युझिलंड विरूद्ध झालेल्या अंतिम सामन्यामध्ये भारताने मोठा विजय मिळवल्यानंतर रोहित आज पत्नी आणि मुलांसोबत मायदेशी परतला आहे. मुंबई विमानतळावर त्याला कटेकोट सुरक्षा व्यवस्था देत गाडीपर्यंत पोहचवण्यात आले. दरम्यान रोहितला पाहून तेथे उपस्थित फॅन्सनी मोठा जल्लोष केला मात्र सुरक्षेचा मोठा फौजफाटा असल्याने फॅन्स त्याच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. दरम्यान विमानतळावर रोहित स्वतः ड्रायव्हिंग सीट वर बसल्याचं पहायला मिळालं आहे.
रोहित शर्मा मुंबईत परतला
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)