Rohit Sharma: सामना सुरु असताना रोहित शर्माच्या नाकातून अचानक रक्त येण्यामागे कारण काय? रक्तस्त्राव होत असतानाही बजावली कर्णधर पदाची चोख जबाबदारी; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
गुवाहाटीतील सामन्यादरम्यान अधिक आर्द्रतेमुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नाकातून रक्तस्त्राव होताना दिसला.
भारत (India) विरुध्द दक्षिण आफ्रिक (South Africa) या सामन्यात 12व्या ओव्हरमध्ये (Over) रोहित शर्माला (Rohit Sharma) पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. गुवाहाटीतील सामन्यादरम्यान अधिक आर्द्रतेमुळे टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माच्या नाकातून रक्तस्त्राव होताना दिसला. दिनेश कार्तिक लगेच त्याच्याकडे धावला. काही वेळाने त्यांनी वैद्यकीय पथकालाही बोलावले. आधी रक्तस्त्राव थांबवण्यासाठी टॉवेलने रक्त पुसताना दिसला पण काही केल्या रक्तस्त्राव थांबत नसल्याने रोहितला अखेरीस ड्रेसिंग रूममध्ये (Dressing Room) वैद्यकीय उपचारांसाठी डगआउटमध्ये परतावे लागले.
Dedication 🙌
Rohit sharma kept giving instructions even after nose bleeding#INDvSA #RohitSharma𓃵 pic.twitter.com/wtnuPZwHiI
— crickaddict45 (@crickaddict45) October 2, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Oct 03, 2022 10:20 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

