Rohit Sharma Sets New Milestone in T20I: रोहित शर्माने केला अनोखा विश्वविक्रम, असा पराक्रम करणार ठरला जगातील पहिला क्रिकेटपटू
तसेच, दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच कर्णधार रोहित शर्माने आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला आहे.
Rohit Sharma New Record: भारत आणि अफगाणिस्तान (IND vs AFG) यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना इंदूरच्या होळकर क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. भारतीय संघाने पहिला सामना जिंकून आतापर्यंतच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. अशा परिस्थितीत आजही अफगाणिस्तानला हरवण्यात भारताला यश आले तर ते मालिका खिशात घालतील. या सामन्यात भारताचा दिग्गज खेळाडू विराट कोहलीही संघात पुनरागमन करणार आहे, त्यामुळे लाखो चाहत्यांची नजर कोहलीवर असणार आहे. दरम्यान, भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच, दुसऱ्या टी-20 सामन्यात नाणेफेकीसाठी मैदानात उतरताच कर्णधार रोहित शर्माने आपल्या नावावर अनोखा विक्रम नोंदवला आहे. रोहित शर्माचा हा 150 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना आहे. या अनोख्या विक्रमाला स्पर्श करणारा रोहित शर्मा जगातील पहिला क्रिकेटपटू ठरला आहे. (हे देखील वाचा: IND vs AFG 2nd T20I Stats And Record Preview: भारत आणि अफगाणिस्तान यांच्यात होणार हाय व्होल्टेज सामना, आजच्या सामन्यात होऊ शकतात 'हे' मोठे विक्रम; येथे पाहा आकडेवारी)
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)