Rohit Sharma बनला टीम इंडियाचा नवा ODI कर्णधार; बीसीसीआयने विराट कोहलीला हटवले

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत

रोहित शर्मा (Photo Credit: Twitter)

भारतीय क्रिकेट संघात मोठे बदल जाहीर करण्यात आले आहेत. रोहित शर्माला टी-20 नंतर एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आले आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या निवड समितीने विराट कोहलीला वनडे कर्णधारपदावरून हटवून ही जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. आता रोहितच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया पुढील वर्षी T20 विश्वचषक आणि 2023 मध्ये होणार्‍या एकदिवसीय विश्वचषक खेळेल. यासोबतच रोहितकडे कसोटी संघाचे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. BCCI ने बुधवार, 8 डिसेंबर रोजी दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी कसोटी संघाची घोषणा केली आणि त्यासोबतच, वरिष्ठ निवड समितीने कसोटी आणि मर्यादित षटकांसाठी वेगवेगळे कर्णधार ठेवण्याच्या निर्णयालाही मान्यता दिली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement