Rishabh Pant Century: कसोटीत पुनरागमन करत ऋषभ पंतचे दमदार शतक, भारताची आघाडी 450 धावांच्या पुढे

तिसऱ्या ऋषभ पंतने 124 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले आहे. ही त्याची पुनरागमनाची कसोटी आहे.

Rishabh Pant Century: कसोटीत पुनरागमन करत ऋषभ पंतचे दमदार शतक, भारताची आघाडी 450 धावांच्या पुढे
Rishabh Pant (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला गुरुवारपासून सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. बांगलादेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आज सामन्याचा तिसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत टीम इंडियाने 23 षटकांत तीन गडी गमावून 81 धावा केल्या होत्या. दरम्यान, तिसऱ्या दिवशी ऋषभ पंतने 124 चेंडूत आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले आहे. ही त्याची पुनरागमनाची कसोटी आहे. डिसेंबर 2022 मध्ये कार अपघातात बळी पडल्यानंतर त्याची ही पहिलीच कसोटी आहे आणि त्यात त्याने शतक झळकावले आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Sep 21, 2024 12:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).