Rinku Singh Sixes: रिंकू सिंगची पुन्हा वादळी खेळी, सुपर ओव्हरमध्ये सलग 3 षटकार मारून संघाला मिळवून दिला विजय (Watch Video)
गुरुवारी, यूपी टी-20 लीगमध्ये मेरठ मावेरिक्सकडून खेळताना, रिंकूने सुपर ओव्हरमध्ये सलग तीन षटकार ठोकून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. काशी रुद्रज विरुद्ध यूपी टी-20 लीग सामन्यात मेरठ मावेरिक्सला सुपर ओव्हर जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असल्याने रिंकू सिंग स्ट्राइकवर होता.
UP T20 2023 Rinku Singh Sixes: रिंकू सिंगने (Rinku Singh) केकेआरला विजय मिळवून देण्यासाठी आयपीएलच्या शेवटच्या षटकात सलग पाच षटकार मारून यूपी टी-20 लीगमधील आपल्या कारनाम्यांची आठवण परत करुन दिली आहे. गुरुवारी, यूपी टी-20 लीगमध्ये मेरठ मावेरिक्सकडून खेळताना, रिंकूने सुपर ओव्हरमध्ये सलग तीन षटकार ठोकून आपल्या संघाला शानदार विजय मिळवून दिला. काशी रुद्रज विरुद्ध यूपी टी-20 लीग सामन्यात मेरठ मावेरिक्सला सुपर ओव्हर जिंकण्यासाठी 17 धावांची गरज असल्याने रिंकू सिंग स्ट्राइकवर होता. फिरकीपटू शिवा सिंगच्या पहिल्या चेंडूवर रिंकूला एकही धाव काढता आली नाही, पण पुढच्या तीन चेंडूंवर त्याने सलग तीन षटकार ठोकत मेरठ संघाला दणदणीत विजय मिळवून दिला. यूपी टी-20 लीगच्या सुपर ओव्हरमध्ये रिंकूने सलग तीन षटकार मारल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
पहा व्हिडिओ
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)