IND vs SA 2nd T20I: रिंकू सिंगच्या जबरदस्त षटकारने स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली (Watch Video)

या खेळीत रिंकूने 9 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. रिंकूने असा षटकार मारला की मैदानात काच फुटली.

Rinku Singh's Six Broke Media Box Glass: दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी-20 मालिकेतील दुसऱ्या सामन्यात पुन्हा एकदा रिंकू सिंग नावाचे वादळ पाहायला मिळाले. दुसऱ्या सामन्यात रिंकूने शानदार खेळी केली. त्याची फलंदाजी पाहता तो प्रथमच दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर खेळत आहे असे अजिबात वाटत नव्हते. या सामन्यात रिंकू सिंगने आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतकही झळकावले आहे. या खेळीत रिंकूने 9 चौकार आणि 2 शानदार षटकार मारले. रिंकूने असा षटकार मारला की मैदानात काच फुटली. रिंकू सिंगने आपल्या खेळीदरम्यान दोन षटकार मारले असले तरी या दोन षटकारांनी त्याने स्टेडियममध्ये बसलेल्या चाहत्यांची मने जिंकली. यातील एक षटकार त्याने अशा प्रकारे मारला की स्टेडियममधील मीडिया बॉक्सची काच फुटली. ज्यांचे फोटो सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)