Will Jacks Century: आरसीबीचा युवा फलंदाज विल जॅकने SA20 मध्ये उडवून दिली खळबळ, ठोकले धडाकेबाज शतक

प्रिटोरिया कॅपिटल्स आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात, विल हा इंग्लिश फलंदाजाने संयुक्त सर्वात वेगवान शतक ठोकणारा खेळाडू बनला आहे.

इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू आणि आरसीबीचा फलंदाज विल जॅकने SA20 2024 मध्ये अप्रतिम शतक झळकावले आहे. त्याने प्रिटोरिया कॅपिटल्ससाठी 42 चेंडूत 101 धावा केल्या आहेत. प्रिटोरिया कॅपिटल्स आणि डर्बन सुपर जायंट्स यांच्यातील सामन्यात, विल हा इंग्लिश फलंदाजाने संयुक्त सर्वात वेगवान शतक ठोकणारा खेळाडू बनला आहे. त्याने बेन रेनच्या विक्रमाची बरोबरी केली. जॅकच्या स्फोटक खेळीत 8 चौकार आणि 8 षटकारांचा समावेश होता, ज्यामुळे कॅपिटल्सने 20 षटकात 204/9 अशी धावसंख्या गाठली. अष्टपैलू विल जॅकचा उत्कृष्ट फॉर्म आयपीएल 2024 च्या दृष्टीकोनातून आरसीबीसाठी चांगला संकेत ठरू शकतो. फ्रँचायझीने आजपर्यंत आयपीएलचे एकही विजेतेपद जिंकलेले नाही.

पाहा व्हिडिओ

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now