CSK Vs RCB, IPL 1st Match Toss Update: आरसीबीने चेन्नई विरुद्ध नाणेफेक जिंकली, फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय, पाहा दोन्ही संघाची प्लेइंग 11
भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ खेळतील. गेल्या 5 वर्षात दोन्ही संघांमध्ये 9 सामने खेळले गेले आहेत.
CSK Vs RCB, IPL 1st Match: इंडियन प्रीमियर लीगच्या 17 व्या मोसमातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर होणाऱ्या या सामन्यात दोन्ही संघ खेळतील. गेल्या 5 वर्षात दोन्ही संघांमध्ये 9 सामने खेळले गेले आहेत. या कालावधीत चेन्नई सुपर किंगने 6 सामने जिंकले आहेत, तर रॉयल चॅलेंजर बंगळुरूने 3 सामन्यात विजयाची चव चाखली आहे. दरम्यान, आरसीबीने टाॅस जिंकून प्रथम फलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज (प्लेइंग इलेव्हन): ऋतुराज गायकवाड (कर्णधार), रचिन रवींद्र, अजिंक्य रहाणे, डॅरिल मिशेल, रवींद्र जडेजा, समीर रिझवी, एमएस धोनी (विकेटकीपर), दीपक चहर, महेश थेक्षाना, मुस्तफिजुर रहमान, तुषार देशपांडे
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, रजत पाटीदार, ग्लेन मॅक्सवेल, कॅमेरून ग्रीन, दिनेश कार्तिक, अनुज रावत (विकेटकीपर), कर्ण शर्मा, अल्झारी जोसेफ, मयंक डागर, मोहम्मद सिराज