RCB vs RR IPL 2021 Match 16: रॉयल चॅलेंजर्स गोलंदाजांचा वेगवान मारा, राजस्थान रॉयल्सने दिले 178 धावांचे आव्हान

इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने टॉस गमावून पहिले फलंदाजी करत 9 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 177 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य दिलं आहे. राजस्थानचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरल्याने शिवम दुबेने जाबाबदारी घेत 46 धावांची निर्णायक खेळी केली.

रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Photo Credit: PTI)

RCB vs RR IPL 2021 Match 16: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 16 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) टॉस गमावून पहिले फलंदाजी करत 9 विकेट गमावून 20 ओव्हरमध्ये 177 धावांपर्यंत मजल मारली आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरला  Royal Challengers Bangalore) विजयासाठी 178 धावांचं लक्ष्य दिलं आहे. राजस्थानचे दिग्गज फलंदाज अपयशी ठरल्याने शिवम दुबेने (Shivam Dube) जाबाबदारी घेत 46 धावांची निर्णायक खेळी केली. अखेर राहुल तेवतिया आणि क्रिस मॉरिसने संघासाठी आव्हानात्मक धावसंख्या गाठली. तेवतिया धावा तर मॉरिस धावा करून नाबाद परतला. दुसरीकडे, आरसीबीकडून मोहम्मद सिराज  (Mohammed Siraj) आणि हर्षल पटेल (Harshal Patel) यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या तर काईल जेमीसन, केन रिचर्डसन आणि वॉशिंग्टन सुंदरने प्रत्येकी 1 विकेट काढली.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement