RCB vs PBKS IPL 2025 Final: आयपीएलच्या फायनल मॅच आधीच नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ दुर्घटना; गॅस सिलिंडरचा स्फोट, आग नियंत्रणात (Video)
अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती. मात्र, अग्निशमन दलाने आग विझवली.
RCB vs PBKS IPL 2025 Final: आरसीबी विरुद्ध पंजाब आयपीएल 2025 (PBKS vs RCB IPL 2025) फायनलपूर्वी अहमदाबादमधून चिंतेत टाकणारी बातमी समोर आली आहे. एका घटनेत नरेंद्र मोदी स्टेडियमच्या (Narendra Modi Stadium) मुख्य प्रवेशद्वाराजवळ गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याची माहिती आहे. जिथे फायनलचा सामना होणार आहे. टीव्ही९गुजरातीने दिलेल्या वृत्तानुसार, अग्निशमन अधिकाऱ्यांनी सिलिंडर स्फोटात लागलेली आग त्वरित विझवली. सुरक्षा कर्मचारी या घटनेची चौकशी करत आहेत. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही किंवा मालमत्तेचे नुकसान झालेले नाही. आरसीबी विरुद्ध पीबीकेएस आयपीएल 2025 फायनलपूर्वी एबी डिव्हिलियर्स रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूला पाठिंबा देण्यासाठी अहमदाबादमध्ये पोहोचला आहे.
नरेंद्र मोदी स्टेडियमजवळ सिलिंडरचा स्फोट
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)