RCB vs KKR, IPL 2022 Match 6: कोलकाताचं कंबरडं मोडत हर्षल पटेल याची कमाल, सहकारी मोहम्मद सिराजच्या विक्रमाशी केली बरोबरी

IPL 2022, RCB vs KKR: कोलकाता नाईट रायडर्स संघाला 18.5 षटकांत 128 धावांत गुंडाळण्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हर्षल पटेलने 2 विकेट्स घेतल्या आणि 2 मेडन्स टाकल्या. असे केल्याने, आयपीएलच्या इतिहासात एका डावात 2 मेडन ओव्हर टाकणारा हर्षल हा केवळ दुसरा गोलंदाज ठरला. हर्षलने त्याचा सहकारी मोहम्मद सिराजच्या आयपीएलच्या एका डावात सर्वाधिक मेडन टाकण्याच्या विक्रमाची बरोबरी केली.

RCB vs KKR, IPL 2022 Match 6: कोलकाताचं कंबरडं मोडत हर्षल पटेल याची कमाल, सहकारी मोहम्मद सिराजच्या विक्रमाशी केली बरोबरी
हर्षल पटेल (Photo Credit: Twitter/IPL)

RCB vs KKR, IPL 2022 Match 6: एका आयपीएल (IPL) सामन्यात दोन मेडन ओव्हर टाकणारा मोहम्मद सिराज (Mohammed Siraj) नंतर हर्षल पटेल (Harshal Patel) हा दुसरा गोलंदाज ठरला आहे. बुधवारी डीवाय पाटील स्टेडियमवर आयपीएल 2022 च्या सहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) त्याने ही कामगिरी केली. योगायोगाने सिराजने अशीच कामगिरी आयपीएल 2020 मध्ये केकेआरविरुद्ध केली होती.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Mar 31, 2022 12:00 AM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).