Sanjay Bangar आणि Mike Hesson यांच्याबाबत RCB ने घेतला मोठा निर्णय, दोन्ही दिग्गज फ्रेंचायझीच्या बाहेर
मात्र, आयपीएलच्या इतिहासात आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही.
इंडियन प्रीमियर लीगचा सर्वात लोकप्रिय संघ रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने (RCB) आयपीएल 2023 (IPL 2023) नंतर प्रशिक्षक संजय बांगर (Sanjay Bangar) आणि क्रिकेट संचालक माईक हेसन (Mike Hesson) यांच्याकडील पदे काढून घेतली आहेत. त्याच वेळी, आरसीबी पुढील आयपीएल हंगामासाठी नवीन कोचिंग स्टाफच्या शोधात आहे. मात्र गोलंदाजी प्रशिक्षक अॅडम ग्रिफिथ यांच्यासोबत आरसीबी कायम राहील की नाही हे अद्याप निश्चित नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे प्रशिक्षक संजय बांगर आणि क्रिकेटचे संचालक माइक हेसन जवळपास 5 वर्षांपासून टीमसोबत काम करत आहेत. मात्र, आयपीएलच्या इतिहासात आरसीबीला एकदाही विजेतेपद मिळालेले नाही. याच कारणामुळे आयपीएलचे जेतेपद पटकावण्यासाठी नवीन कल्पना देऊ शकेल अशा अनुभवी खेळाडूच्या शोधात संघ आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)