RR vs RCB, IPL 2024 19th Match Live Score Update: आरसीबीला तिसरे यश, रियान पराग आऊट, बटलर क्रीजवर उपस्थित

प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने राजस्थानसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 113 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक दोन बळी घेतले.

RR vs RCB, IPL 2024 19th Match Live Score Update: आरसीबीला तिसरे यश, रियान पराग आऊट, बटलर क्रीजवर उपस्थित

RR vs RCB, IPL 2024 19th Match: इंडियन प्रीमियर लीग 2024 (IPL 2024) च्या 19 व्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि राजस्थान रॉयल्स (RCB vs RR) आमनेसामने आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर (Jaipur Sawai Mansingh Stadium) हा सामना खेळवला जात आहे. लीगमधील दोन्ही संघांच्या आतापर्यंतच्या कामगिरीवर नजर टाकली तर राजस्थान रॉयल्सने सर्व 3 सामने जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, आरसीबीने 4 पैकी फक्त 1 सामना जिंकला आहे आणि 3 मध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, राजस्थानने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करताना आरसीबीने राजस्थानसमोर 184 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आरसीबीकडून विराट कोहलीने सर्वाधिक 113 नाबाद धावांची खेळी खेळली. राजस्थानकडून युजवेंद्र चहलने सर्वाधिक दोन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी राजस्थान रॉयल्स संघाला 20 षटकात 184 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी राजस्थानला तिसरा धक्का लागला आहे.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on Apr 06, 2024 10:47 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).