Ranji Trophy 2022: 7 वर्षानंतर मध्य प्रदेशचा मोठा पराक्रम, पंजाबचा पराभव करत उपांत्य फेरीत केला दिमाखदार प्रवेश
Ranji Trophy 2022 Quarter-Final: गोलंदाजांच्या दमदार कामगिरीनंतर शुभम शर्माचे शानदार शतक आणि रजत पाटीदार आणि हिमांशू मंत्री यांच्या अर्धशतकांच्या जोरावर मध्य प्रदेशने पंजाबचा 10 गडी राखून पराभव केला. मध्य प्रदेशसमोर 26 धावांचे लक्ष्य होते जे त्यांनी सहाव्या षटकात एकही विकेट न गमावता पूर्ण केले. या विजयासह मध्य प्रदेश संघाने तब्ब्ल सात वर्षांनंतर उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
Ranji Trophy 2022 Quarter-Final: कुमार कार्तिकेयच्या (Kumar Kartikey) सनसनाटी सहा विकेट्सच्या जोरावर मध्य प्रदेशने (Madhya Pradesh) गुरुवारी अलूर (Allur) येथे त्यांच्या उपांत्यपूर्व फेरीच्या चौथ्या दिवशी पंजाबला नमवले आणि 2016/17 हंगामानंतर त्यांची पहिली रणजी करंडक उपांत्य (Ranji Trophy Semifinal) फेरी गाठली.
Madhya Pradesh Won by 10 Wicket(s) (Qualified) #PUNvMP #RanjiTrophy #QF4 Scorecard:https://t.co/1DpdHD8nhh
— BCCI Domestic (@BCCIdomestic) June 9, 2022
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Jun 09, 2022 02:34 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

