Ranji Trophy 2022: कर्नाटकचा 5 विकेट्सने धुव्वा उडवत उत्तर प्रदेश संघाची उपांत्य फेरीत धडक, करण शर्माची चमकदार कामगिरी
Ranji Trophy 2022 Quarter-Finals: करण शर्माने 162 चेंडूत 93 नाबाद धावा केल्या आणि रणजी ट्रॉफी 2021/22 च्या उपांत्य फेरीत पोहोचण्यात उत्तर प्रदेशला कर्नाटकवर 5 गडी राखून विजय मिळवून दिला. कर्नाटकने रिंकू सिंह आणि प्रियम गर्ग यांना एकापाठोपाठ काढून उत्तर प्रदेशला अडचणीत पाडले, परंतु करण शर्माने काही शांतता पुनर्संचयित करण्यासाठी मोर्चा सांभाळला.
करण शर्माच्या (Karan Sharma) शानदार 93 धावांच्या नाबाद खेळीच्या जोरावर उत्तर प्रदेशने (Uttar Pradesh) बुधवारी KSCA क्रिकेट मैदानावरील तिसऱ्या उपांत्यपूर्व फेरीत कर्नाटकचा (Karnataka) 5 गडी राखून पराभव करून रणजी ट्रॉफी (Ranji Trophy) 2022 च्या उपांत्य फेरीत धडक मारली.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)