Ranji Trophy 2022: पदार्पणात सामन्यात भारताचा U19 कर्णधार Yash Dhull याचा डंका, तामिळनाडूविरुद्ध केल्या ताबडतोड धावा (Watch Video)
दिल्लीकडून सलामीला येत त्याने तामिळनाडूविरुद्ध सामन्यात शतक झळकावले. त्याने पहिला रणजी सामना खेळताना पहिल्याच डावात हे शतक झळकावले. त्याने 16 चौकारांसह आपल्या पहिल्या रणजी शतक ठोकले. तामिळनाडूविरुद्ध दिल्लीची सुरुवात खराब झाली. आणि अवघ्या 7 धावांत 2 विकेट पडल्यावर 19 वर्षीय यशने कमान हाती घेतली.
Ranji Trophy 2022: भारताच्या अंडर-19 विश्वचषक (U19 World Cup) विजेत्या कर्णधार यश धुलने (Yash Dhull) आपला जबरदस्त फॉर्म कायम ठेवला आणि दिल्ली राज्य संघासाठी शतक झळकावले व आपल्या रणजी करंडक (Ranji Trophy) कारकिर्दीला सुरुवात केली आहे. त्याचा पहिला रेड-बॉल सामना खेळताना धुलने 133 चेंडूत शंभरी टप्पा गाठला. धुलने दिल्लीचा (Delhi) डाव सावरला आणि वरिष्ठ फलंदाज नितीश राणा सोबत तिसऱ्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण 60 धावा जोडल्या. राणा बाद झाल्यावर धुलने धावफलक हलता ठेवला आणि आतापर्यंत जॉन्टी सिद्धूसह चौथ्या विकेटसाठी 100 पेक्षा अधिक धावा जोडल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)