CSK vs RR, IPL 2024 61th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 61 वा सामना (IPL 2024) चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात (CSK vs RR) चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जात आहे. आयपीएल 2024 मध्ये राजस्थान रॉयल्सची आतापर्यंतची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दुसरीकडे, पाच वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जची कामगिरी संमिश्र झाली आहे. हा संघ प्लेऑफच्या शर्यतीत कायम आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजी करत राजस्थानने चेन्नईसमोर ठेवले 142 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. राजस्थान रॉयल्ससाठी रियान परागने नाबाद 47 धावांची सर्वोत्तम खेळी खेळली. चेन्नई सुपर किंग्जकडून सिमरजीत सिंगने सर्वाधिक तीन बळी घेतले. हा सामना जिंकण्यासाठी चेन्नई सुपर किंग्ज संघाला 20 षटकात 142 धावा करायच्या आहेत.
Innings Break
Simarjeet (3/26), Deshpande (2/30) help Chennai Super Kings restrict Rajasthan Royals to 141/5
Follow Live: https://t.co/SxE7Z5n0Lv pic.twitter.com/nXpNqtWYGZ
— TOI Sports (@toisports) May 12, 2024
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)