RR vs RCB, IPL 2024 Eliminator Toss Update: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली, प्रथम गोलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
या सामन्यात पराभूत होणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर, विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे.
RR vs RCB, IPL 2024 Eliminator: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 मध्ये राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात एलिमिनेटर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात पराभूत होणारा संघ अंतिम फेरीच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर, विजेता संघ क्वालिफायर 2 मध्ये सनरायझर्स हैदराबादशी भिडणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात एलिमिनेटर सामना खेळण्याची ही पहिलीच वेळ नाही. 9 वर्षांपूर्वी म्हणजेच 2015 आयपीएलमध्ये दोन्ही संघांमध्ये एलिमिनेटर सामना खेळला गेला होता. त्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने राजस्थान रॉयल्सवर 71 धावांनी विजय मिळवला होता. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
राजस्थान रॉयल्स (प्लेइंग इलेव्हन): यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (विकेटकीपर/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान, संदीप शर्मा, युझवेंद्र चहल
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू (प्लेइंग इलेव्हन): विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, ग्लेन मॅक्सवेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), महिपाल लोमरोर, कर्ण शर्मा, यश दयाल, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन
Eliminator. Rajasthan Royals Won the Toss & elected to Field https://t.co/b5YGTn6RZd #TheFinalCall #TATAIPL #IPL2024 #RRvRCB
— IndianPremierLeague (@IPL) May 22, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 22, 2024 07:10 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

