RR vs PBKS, IPL 2024 Toss Update: राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे.
RR vs PBKS, IPL 2024 65th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 65 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात खेळला जात आहे. दोन्ही संघांमधील हा सामना गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला जात आहे. पंजाब किंग्ज आधीच प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर आहे. दुसरीकडे, राजस्थान रॉयल्सने प्लेऑफसाठी जवळपास पात्रता मिळवली आहे. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
दोन्ही संघांच्या प्लेइंग इलेव्हनवर एक नजर
राजस्थान रॉयल्स: यशस्वी जैस्वाल, टॉम कोहलर-कॅडमोर, संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), रियान पराग, ध्रुव जुरेल, रोवमन पॉवेल, रविचंद्रन अश्विन, ट्रेंट बोल्ट, संदीप शर्मा, आवेश खान, युझवेंद्र चहल.
पंजाब किंग्ज: प्रभसिमरन सिंग, जॉनी बेअरस्टो, रिले रोसो, शशांक सिंग, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), सॅम कुरन (कर्णधार), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, नॅथन एलिस, राहुल चहर, अर्शदीप सिंग.
🚨 Toss Update 🚨
Rajasthan Royals elect to bat against Punjab Kings.
Follow the Match ▶️ https://t.co/IKSsmcpSsa#TATAIPL | #RRvPBKS pic.twitter.com/Y0pglUEwUO
— IndianPremierLeague (@IPL) May 15, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 07:27 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

