IND vs AUS 2nd ODI Live Score Update: इंदूरमध्ये पावसाला सुरुवात, थांबवण्यात आला सामना; भारताविरुद्ध ऑस्ट्रेलियाची धावसंख्या 56/2

भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील एकदिवसीय मालिकेतील दुसरा सामना इंदूरमध्ये होत आहे. टीम इंडियाला हा सामना जिंकून मालिका जिंकायची आहे. त्याचबरोबर ऑस्ट्रेलिया मालिकेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना भारताने पाच गडी गमावून 399 धावा केल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसऱ्या वनडेमध्ये पावसाने पुन्हा एकदा कहर केला आहे. पावसामुळे सामना थांबवण्याची ही दुसरी वेळ आहे. मैदान पूर्णपणे कव्हरने झाकले गेले आहे. खेळ थांबला तेव्हा ऑस्ट्रेलियाने नऊ षटकांत दोन बाद 56 धावा केल्या आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement