Rachin Ravindra Injured Video: झेल पकडण्याच्या प्रयत्नात रचिन रवींद्रच्या चेहऱ्यावर लागला चेंडू, Live सामन्यात खेळाडू रक्तबंबाळ

त्याआधी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात चेंडू रवींद्रच्या चेहऱ्यावर लागला.

Rachin Ravindra Injured (Photo Credit -X)

NZ Beat PAK 1st ODI Match Scorecard: पाकिस्तान एकदिवसीय तिरंगी मालिकेचा (Pakistan ODI Tri-Series, 2025) पहिला सामना आज म्हणजेच 8 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ आणि न्यूझीलंड राष्ट्रीय क्रिकेट संघ यांच्यात लाहोरच्या (Lahore)  गद्दाफी स्टेडियमवर  (Gaddafi Stadium)  खेळला जात आहे. या सामन्यात किवी संघाने पाकिस्तानचा 78 धावांनी पराभव केला. 331 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ फक्त 252 धावांवर बाद झाला. त्याआधी न्यूझीलंडचा अष्टपैलू खेळाडू रचिन रवींद्र (Rachin Ravindra) पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यादरम्यान गंभीर जखमी झाला आहे. पाकिस्तानच्या डावाच्या 38 व्या षटकात चेंडू रवींद्रच्या चेहऱ्यावर लागला. खुसदिल शाहने खोलवर शॉट मारला. रचिनने तो पकडण्याचा प्रयत्न केला पण चेंडू त्याच्या हातातून निसटला. चेंडू त्याच्या चेहऱ्यावर लागला आणि तो रक्ताने माखला. चेहऱ्यावरून रक्त पाण्यासारखे पडू लागले.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now