Ravichandran Ashwin Century: आर अश्विनने कसोटी कारकिर्दीतील झळकावले सहावे शतक, टीम इंडियाची सामन्यात मजबूत पकड

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया सध्या पहिल्या स्थानावर आहे. तर बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे.

R Ashwin (Photo Credit - X)

India National Cricket Team vs Bangladesh National Cricket Team: भारत (Indian National Cricket Team) आणि बांगलादेश (Bangladesh National Cricket Team) यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याला सुरुवात झाली आहे. हा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडिया सध्या पहिल्या स्थानावर आहे. तर बांगलादेश चौथ्या स्थानावर आहे. अशा स्थितीत दोन्ही संघांमध्ये कडवी स्पर्धा होणार आहे. भारतीय संघाचे नेतृत्व रोहित शर्माकडे आहे. तर बांगलादेश संघाचे नेतृत्व नजमुल हुसेन शांतोकडे आहे. दरम्यान, बांगालदेशने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाचा अष्ट्रपेलु खेळाडू आर अश्विनने आपल्या कसोटी कारकिर्दीतील सहावे शतक झळकावले आहे. भारताचा स्कोर 275/6

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)

Share Now

Share Now