Punjab Beat Rajasthan: पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून केला पराभव, सॅम कुरनची विजयी खेळी

आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 65 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पाच विकेट राखुन पराभव केला आहे.

Punjab Beat Rajasthan: पंजाब किंग्जने राजस्थानचा पाच गडी राखून केला पराभव, सॅम कुरनची विजयी खेळी

RR vs PBKS, IPL 2024 65th Match: आज इंडियन प्रीमियर लीग 2024 चा 65 वा सामना राजस्थान रॉयल्स आणि पंजाब किंग्ज (RR vs PBKS) यांच्यात गुवाहाटी येथील बारसापारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यात पंजाबने राजस्थानचा पाच विकेट राखुन पराभव केला आहे. तत्तपुर्वी, राजस्थान रॉयल्सचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदांजी करत राजस्थानने पंजाबसमोर 145 धावांचे लक्ष्य ठेवले. राजस्थान रॉयल्सकडून रियान परागने सर्वाधिक 48 धावांची खेळी केली. पंजाब किंग्जकडून हर्षल पटेल, सॅम कुरन आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन बळी घेतले. दुसरीकडे, लक्ष्याचा पाठलाग करताना पंजाब किंग्ज संघाने अवघ्या 18.5 षटकांत पाच गडी गमावून सहज लक्ष्य गाठले. पंजाब किंग्जकडून स्फोटक फलंदाज सॅम कुरनने सर्वाधिक नाबाद 63 धावांची खेळी खेळली. राजस्थान रॉयल्सकडून युझवेंद्र चहल आणि आवेश खान यांनी प्रत्येकी सर्वाधिक दोन विकेट घेतल्या.

(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)

(The above story first appeared on LatestLY on May 15, 2024 11:19 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).