CSK vs PBKS IPL 2024 Live Score Update: पंजाबला पहिला धक्का बसला, प्रभसिमरन सिंग आऊट
पंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईने 162 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 62 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.
CSK vs PBKS IPL 2024: आयपीएल 2024 चा 49 वा (IPL 2024) सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज (CSK vs PBKS) यांच्यात चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जात आहे. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. ऋतुराज गायकवाडचा संघ 10 गुणांसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे पंजाब किंग्जची कामगिरी निराशाजनक झाली आहे. त्यांना 9 पैकी फक्त 3 सामने जिंकता आले आहेत. ते 6 गुणांसह गुणतालिकेत 8व्या स्थानावर आहेत. दरम्यान, पंजाबने टाॅस जिंकून गोलंदांजी करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रथम फलंदांजीसाठी आलेल्या चेन्नईने 162 धावा केल्या. चेन्नई सुपर किंग्जकडून सलामीवीर ऋतुराज गायकवाडने सर्वाधिक 62 धावा केल्या. पंजाब किंग्जकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चहर यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. पंजाब किंग्ज संघाला हा सामना जिंकण्यासाठी 20 षटकात 163 धावा करायच्या आहेत. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या पंजाबला पहिला धक्का लागला आहे. पंजाबचा स्कोर 23/1
Match 49. WICKET! 3.1: Prabhsimran Singh 13(10) ct Ruturaj Gaikwad b Richard Gleeson, Punjab Kings 19/1 https://t.co/4Hhhieizct #TATAIPL #IPL2024 #CSKvPBKS
— IndianPremierLeague (@IPL) May 1, 2024
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 01, 2024 10:02 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

