Pune: क्रिकेटर Kedar Jadhav चे वडील पुण्यातून बेपत्ता; पोलिसात तक्रार दाखल, शोध सुरु

त्याचे वडील महादेव जाधव हे 85 वर्षांचे आहेत. त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे.

Kedar Jadhav

भारतीय क्रिकेटपटू केदार जाधवचे वडील महादेव जाधव हे पुण्यातून बेपत्ता झाले आहेत. ते बेपत्ता झाल्याची तक्रार अलंकार पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. ते सकाळी 11.30 वाजलेपासून बेपत्ता झाले आहेत. तक्रारीनंतर पुण्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, परिसरात मॅन्युअली शोध सुरू आहे.

केदार आपल्या कुटुंबासोबत पुण्यातील कोथरूड परिसरात राहतो. त्याचे वडील महादेव जाधव हे 85 वर्षांचे आहेत. त्यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे. आज सकाळी 11.30 वाजता ते घरातून फिरायला बाहेर पडले, पण त्यानंतर ते घरी परतलेले नाहीत. त्यांच्याजवळ मोबाईल होता मात्र आता तो बंद येत आहे. महादेव जाधव यांना कोणी पाहिल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे आव्हान केदारच्या कुटुंबियांकडून करण्यात आले आहे.

('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)