Prithvi Shaw Controversy: पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ, सपना गिलचा विनयभंग केल्याबद्दल फौजदारी तक्रार दाखल
गेल्या आठवड्यात, उपनगरातील हॉटेलमध्ये सेल्फी घेण्यावरून झालेल्या भांडणानंतर शॉवरील हल्ल्याप्रकरणी गिल आणि इतर काहींना अटक करण्यात आली होती. सोमवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गिलला जामीन मंजूर केला.
सोशल मीडियाची 'इंफ्लुएंसर' सपना गिल (Sapna Gill) हिने मुंबई पोलिसांकडे (Mumbai Police) तक्रार दाखल केली असून, भारतीय क्रिकेटपटू पृथ्वी शॉ आणि इतरांविरुद्ध विनयभंग केल्याप्रकरणी एफआयआर नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात, उपनगरातील हॉटेलमध्ये सेल्फी घेण्यावरून झालेल्या भांडणानंतर शॉवरील हल्ल्याप्रकरणी गिल आणि इतर काहींना अटक करण्यात आली होती. सोमवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयाने गिलला जामीन मंजूर केला. गिलचे वकील काशिफ अली खान यांनी सोमवारी अंधेरीच्या विमानतळ पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीत शॉ, त्याचा मित्र आशिष यादव आणि इतरांविरुद्ध विनयभंग आणि अपमानजनक विनयभंग केल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)