Prithvi Shaw Double Century: इंग्लंडच्या धरतीवर पृथ्वी शॉची धडाकेबाज फलंदाजी, ठोकले द्विशतक; केल्या इतक्या धावा (Watch Video)
इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वन डे चषकात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना पृथ्वी शॉने सॉमरसेटविरुद्ध शानदार फलंदाजी केली. ओपनिंग करताना त्याने अवघ्या 129 चेंडूत द्विशतक झळकावले. सुरूवातीच्या 81 चेंडूत शतक अन् पुढच्या 50 चेंडूत द्विशतकाला गवसणी घालून पृथ्वीने ऐतिहासिक खेळी केली.
गेल्या काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या पृथ्वी शॉने (Prithvi Shaw) आपल्या स्फोटक फलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. इंग्लंडमध्ये खेळल्या जात असलेल्या वन डे चषकात नॉर्थम्प्टनशायरकडून खेळताना पृथ्वी शॉने सॉमरसेटविरुद्ध शानदार फलंदाजी केली. ओपनिंग करताना त्याने अवघ्या 129 चेंडूत द्विशतक झळकावले. सुरूवातीच्या 81 चेंडूत शतक अन् पुढच्या 50 चेंडूत द्विशतकाला गवसणी घालून पृथ्वीने ऐतिहासिक खेळी केली. पृथ्वीने शेवटच्या षटकापर्यंत 150 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. त्याने 153 चेंडूत 28 चौकार आणि 11 षटकारांसह एकूण 244 धावा केल्या. जरी त्याने आणखी तीन चेंडू खेळले असते तर तो नाबाद राहिला असता. 50 व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर डॅनी लॅम्बने त्याला जॉर्ज थॉमसकरवी झेलबाद केले आणि पॅव्हेलियनमध्ये पाठवले. या शानदार खेळीत पृथ्वी 219 मिनिटे मैदानातच राहिला. हा त्याच्या लिस्ट ए कारकिर्दीतील सर्वात मोठा स्कोअर होता.
पहा व्हिडिओ
🚨 PRITHVI SHAW HAS 200! 🚨#MBODC23 pic.twitter.com/GeVYVD3o6z
— Metro Bank One Day Cup (@onedaycup) August 9, 2023
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 09, 2023 08:24 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

