IND vs NZ 1st T20: संघातील निवडीबाबत पृथ्वी शॉचे मोठे वक्तव्य, प्लेइंग 11 मध्ये संधी मिळण्याबाबत सांगितली 'ही' गोष्ट (Watch Video)
पृथ्वी शॉने आपल्या ताज्या मुलाखतीत या सर्व गोष्टींचे उत्तर दिले आहे. पृथ्वी शॉने बीसीसीआय टीव्हीशी खास संवाद साधताना त्याच्या निवडीपासून ते संघातील 11व्या खेळाडूपर्यंत अनेक गोष्टींवर उत्तरे दिली आहेत.
टीम इंडियाचा धडाकेबाज सलामीवीर पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) दीर्घ काळानंतर टीम इंडियात परतला आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या T20I मालिकेसाठी त्याचा संघात समावेश करण्यात आला आहे. शॉ बराच काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. गेल्या काही काळापासून तो देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीने खूप चर्चेत होता. सोशल मीडिया वापरकर्त्यांपासून अनेक क्रिकेटपंडितांपर्यंत सर्वजण त्याच्या परतीची मागणी करत होते. अशा परिस्थितीत आता शॉचे पुनरागमन झाल्याने त्याला प्लेइंग 11 मध्ये संधी मिळणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. पृथ्वी शॉने आपल्या ताज्या मुलाखतीत या सर्व गोष्टींचे उत्तर दिले आहे. पृथ्वी शॉने बीसीसीआय टीव्हीशी खास संवाद साधताना त्याच्या निवडीपासून ते संघातील 11व्या खेळाडूपर्यंत अनेक गोष्टींवर उत्तरे दिली आहेत. संघात पुनरागमन करताना खूप आनंद होत असल्याचे शॉने पहिल्यांदाच सांगितले. वाईट काळात सोबत असल्याबद्दल त्यांनी कुटुंबीयांचे आभारही मानले. याशिवाय वडिलांचे विविध प्रसंग सांगताना त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या.
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)